साधू होण्याची इच्छा होती
कधीकाळी मोदी यांना साधू होण्याची इच्छा झाली होती. दोन वर्षे त्यांनी हिमालयात पायपीट केली. पश्चिम बंगालमधील रामकृष्ण आश्रमातही ते राहिले. एक दिवस अचानक हा विचार त्यागून ते घरी परतले. घर चालवण्यासाठी मोदी यांना अहमदाबादमध्ये राज्य परिवहन कार्यालयाबाहेर चहाची टपरीही टाकावी लागली. येथेच शाखेतून परतणार्या संघ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींनी मोदींना बदलून टाकले. त्यांनी दुकान गुंडाळले आणि संघात दाखल झाले. 1995 मध्ये मोदींना भाजपने राष्ट्रीय सरचिटणीस केले आणि पाच राज्यांची जबाबदारी सोपवली. 2001 मध्ये केशुभार्इंनंतर भाजपने मोदी यांना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी बसवले.

No comments:
Post a Comment