Pages

शिक्षणानेच उद्धार हा मंत्र देणारा महामानव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टा महामानव होते. नव्या जगात शिक्षण आणि संघटना ही दोन महत्वाची हत्यारे ठरणार आहेत, हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच ‘शिका आणि संघटित व्हा’ असा संदेश त्यांनी भारतीय दलित समाज बांधवाना दिला. तसे पहिले तर, बाबासाहेब आंबेडकराना भारताचे “मार्टीन ल्यूथर किंग” मानता येईल. त्याच निकडीने आणि कदाचित त्यांच्याही आधी बाबासाहेबांनी भारतातील अस्पृश्य गणलेल्या विविध समाज घटकांच्या उन्नतीसाठी काम सुरु केले आणि आत्मोद्धारासाठी शिक्षणाचा महामार्ग देखील त्यांनी या वंचिताना खुला करून दिला. त्यासाठी पदरमोड करून त्यांनी शाळा आणि महाविद्यालये सुरु केली. अध्ययन आणि अध्यापनात अखंड रमलेल्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये काही काळ कायदामंत्री म्हणूनही काम पाहिले. काँग्रेस नेतृत्वाशी त्यांची वैचारिक नाळ कधीच जुळली नव्हती. दलितांच्या प्रगतीबद्दलचे काँग्रेसचे बेगडी प्रेम त्यांनी खूप आधी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’, ‘मूकनायक’ ही नियतकालिके चालवली.जगातील विविध धर्मांच्या सखोल परिशीलनानंतर हिंदू धर्म सर्वात परिपूर्ण आहे असे त्यांचे मत झाले होते. तथापि हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि अन्य काही बाबी त्यांना नेहमीच खटकत होत्या. त्यामुळेच त्यांनी अखेर हिंदूधर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचे विपुल लेखन आजही वाचकांना विचार प्रवृत्त करते.

No comments:

Post a Comment