बाभळी



हिरवी हिरवी गार पालवी
काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवले
फांदी तर कालोखी काली
कुसर कलाकृति अशी बाभळी 
तिला न ठावी नागर रीती
दूर कुठेतरी बांध्यावरती
झुकुन जराशी उभी एकटी
अंगावरती खेलवी राघू
लाघट शेल्या पायाजवली
बाल गुराखी होउनिया मन 
रमते तेथे सांज- सकाळी
येते परतून नवेच होउन
लेवुन हिरवे नाजुक लेने
अंगावरती माखुन अवघ्या 
धुंद सुवासिक पिवले उटने
---------इंदिरा संत

No comments:

Post a Comment