हरि तू निष्टुर निर्गुण |
नाही माया बहु कठीण |नव्हे ते करिसी आन |
कवणे नाही केले ते ||१||
बळी सर्वस्वे उदार |
जेणे उभारिला कर |
करुनी काहार |
तो पाताळी घातला ||६||
-संत तुकाराम
या वचनाचा आशय असा -
हे हरी,तू निष्टुर आहेस.
दुसऱ्या कोणी केले नाही.
असे (निष्टुरपणाचे कर्म)
तू करतोस.
बळी सर्व दृष्टींनी उदार होता.
त्याने(तुला भूमीचे दान देण्याच्या
उद्देशाने उदक सोडण्यासाठी)
हात उचललेला होता.
(पण)तू कहर (जुलुमाचा अतिरेक )
करून त्याला पाताळात घातलेस.

No comments:
Post a Comment