द्रष्टा सामाजिक नेता - महात्मा जोतिबा फुले
आजच्या युगातील परवलीचा शब्द असलेल्या सामाजिक समतेची जाणीव महाराष्ट्राला ज्योतिबा फुले यांनीच प्रथम करून दिली. महिला सबलीकरणाचा मार्ग शिक्षणाच्या दिशेनेच जातो हे ओळखून स्त्री शिक्षणाचा आग्रह धरणारे ते पहिले भारतीय होते. त्यांच्या काळाला अनुसरून त्यांनी ब्राह्मण, भट-भिक्षुक त्यांच्याबद्दल कडवट किंवा अनुदार उद्गार काढले. परंतु आज मागे वळून पाहताना ते आवश्यकच होते, असे जाणवते. ज्योतिबा फुले यांनी विपुल लेखन केले. त्यातून त्यांची सामाजिक बांधिलकी, द्रष्टेपणा, समाजातील उपेक्षित वर्गाबद्दलचा कळवळा आपल्याला जाणवतो. त्यांनी लिहिलेले ‘शेतकऱ्याचा आसूड’ हे नाटक वाचले असता, आज २०० वर्षे झाली तरीही, शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेत काहीच फरक पडलेला नाही हे जाणवते. भारतातल्या शिक्षण पद्धती संबंधाने त्यांनी हंटर कमिशन समोर दिलेली साक्ष आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. यातच त्यांचे द्रष्टेपण दडलेले आहे. या द्रष्ट्या नेत्याचे विचार काही वेळा आपल्याला पटले नाहीत तरीही ते आजच्या काळात सुद्धा मार्गदर्शक ठरणारे आहेत हे निश्चित.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment