जय जय रघुवीर समर्थ...!!!
गणाधीश जो ईश सर्वां
गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो
निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ
चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या
राघवाचा ॥१॥
मना सज्जना
भक्तिपंथेंचि जावें ।
तरी श्रीहरी
पाविजेतो स्वभावें ।
जनीं निंद्य तें
सर्व सोडूनि द्यावें ।
जनीं वंद्य तें सर्व
भावें करावें ॥२॥
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ।
पुढें वैखरी राम
आधीं वदावा ।
सदाचार हा थोर सोडूं
नये तो ।
जनीं तोचि तो मानवीं
धन्य होतो ॥३॥
मना वासना दुष्ट
कामा नये रे ।
मना सर्वथा
पापबुद्धी नको रे ।
मना सर्वथा नीति
सोडूं नको हो ।
मना अंतरीं सारवीचार
राहो ॥४॥
मना पापसंकल्प
सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प
जीवीं धरावा ।
मना कल्पना ते नको
वीषयांची ।
विकारें घडे हो जनीं
सर्व ची ची ॥५॥
नको रे मना क्रोध हा
खेदकारी ।
नको रे मना काम
नानाविकारी ।
नको रे मना सर्वथा
अंगिकारूं ।
नको रे मना मत्सरू
दंभभारू ॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ठ
जीवीं धरावें ।
मना बोलणें नीच
सोशीत जावें ।
स्वयें सर्वदा नम्र
वाचे वदावें ।
मना सर्व लोकांसि रे
नीववावें ॥७॥
देहे त्यागितां
कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि
क्रीया धरावी ।
मना चंदनाचेपरी
त्वां झिजावें ।
परी अंतरीं सज्जना
नीववावें ॥८॥
नको रे मना द्रव्य
तें पूढिलांचें ।
अति स्वार्थबुद्धीन
रे पाप सांचे ।
घडे भोगणें पाप तें
कर्म खोटें ।
न होतां मनासारिखें
दुःख मोठें ॥९॥
सदा सर्वदा प्रीति
रामीं धरावी ।
दुःखाची स्वयें
सांडि जीवीं करावी ।
देहेदुःख हें सूख
मानीत जावें ।
विवेकें सदा
स्वस्वरूपीं भरावेंं ॥१०॥
जनीं सर्वसूखीं असा
कोण आहे ।
विचारें मना तूंचि
शोधूनि पाहें ।
मना त्वांचि रे
पूर्वसंचीत केलें ।
तयासारिखें भोगणें
प्राप्त जालें ॥११॥
मना मानसीं दुःख
आणूं नको रे ।
मना सर्वथा शोक
चिंता नको रे ।
विवेकें देहेबुध्दि
सोडूनि ्द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति
भोगीत जावी ॥१२॥
मना सांग पां रावणा
काय जालें ।
अकस्मात तें राज्य
सर्वे बुडालें ।
म्हणोनी कुडी वासना
सांडिं वेगीं ।
बळें लागला काळ हा
पाठिलागीं ॥१३॥
जिवा कर्मयोगें जनीं
जन्म जाला ।
परी सेवटीं काळमूखीं
निमाला ।
महा थोर ते
मृत्युपंथेंचि गेले ।
कितीयेक ते जन्मले
आणि मेले ॥१४॥
मना पाहतां सत्य हे
मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही
जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्वही
मानिताती ।
अकस्मात सांडूनियां
सर्व जाती ॥१५॥
मरे येक त्याचा दुजा
शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढें
जात आहे ।
पुरेना जनीं लोभ रे
क्षोभ त्यातें
म्हणोनी जनीं मागुता
जन्म घेतें ॥१६॥
मनीं मानव व्यर्थ
चिंता वहातें ।
अकस्मात होणार होऊनि
जातें ।
घडे भोगणें सर्वही
कर्मयोगें ।
मतीमंद तें खेद मानी
वियोगें ॥१७॥
मना राघवेंवीण आशा
नको रे ।
मना मानवाची नको
कीर्ति तूं रे ।
जया वर्णिती वेद
शास्त्रें पुराणें ।
तया वर्णितां सर्वही
श्लाघ्यवाणें ॥१८॥
मना सर्वथा सत्य
सोडूं नको रे ।
मना सर्वथा मिथ्य
मांडूं नको रे ।
मना सत्य तें सत्य
वाचे वदावें ।
मना मिथ्य तें मिथ्य
सोडूनि द्यावें ॥१९॥
बहू हिंपुटी होइजे
मायपोटीं ।
नको रे मना यातना
तेचि मोठी ।
निरोधें पचे
कोंडिलें गर्भवासीं ।
अधोमूख रे दुःख त्या
बाळकासी ॥२०॥
मना वासना चूकवीं
येरझारा ।
मना कामना सांडिं रे
द्रव्यदारा ।
मना यातना थोर हे
गर्भवासीं ।
मना सज्जना भेटवीं
राघवासी ॥२१॥
मना सज्जना हीत
माझें करावें ।
रघूनायका दृढ
चित्तीं धरावें ।
महाराज तो स्वामि
वायूसुताचा ।
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा
॥२२॥
न बोलें मना
राघवेंवीण कांहीं ।
जनीं वाउगें बोलतां
सूख नाहीं ।
घडीनें घडी काळ
आयुष्य नेतो ।
देहांतीं तुला कोण
सोडूं पहातो ॥२३॥
रघुनायकावीण वायां
सिणावें ।
जनासारिखें व्यर्थ
कां वोसणावें ।
सदा सर्वदा नाम
वाचें वसों दे ।
अहंता मनीं पापिणी
ते नसों दे ॥२४॥
मना वीट मानूं नको
बोलण्याचा ।
पुढें मागुता राम
जोडेल कैंचा ।
सुखाची घडी लोटतां
सूख आहे ।
पुढें सर्व जाईल
कांहीं न राहे ॥२५॥
देहेरक्षणाकारणें
यत्न केला ।
परी शेवटीं काळ
घेऊनि गेला ।
करीं रे मना भक्ति
या राघवाची ।
पुढें अंतरीं सोडिं
चिंता भवाची ॥२६॥
भवाच्या भयें काय
भीतोस लंडी ।
धरीं रे मना धीर
धाकासि सांडीं ।
रघुनायकासारिखा
स्वामि शीरीं ।
नुपेक्षी कदा
कोपल्या दंडधारी ॥२७॥
दिनानाथ हा राम
कोदंडधारी ।
पुढें देखतां काळ
पोटीं थरारी ।
जना वाक्य नेमस्त
हें सत्य मानीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥२८॥
पदीं राघवाचे सदा
ब्रीद गाजे ।
बळें भक्तरीपूशिरीं
कांबि वाजे ।
पुरी वाहिली सर्व
जेणें विमानीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥२९॥
समर्थाचिया सेवका
वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळीं
कोण आहे ।
जयाची लिळा वर्णिती
लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३०॥
महासंकटीं सोडिलें
देव जेणें ।
प्रतापें बळें आगळा
सर्वगूणें ।
जयातें स्मरे शैलजा
शूळपाणी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३१॥
अहल्या शिळा राघवें
मुक्त केली ।
पदीं लागतां दिव्य
होऊनि गेली ।
जया वर्णितां सीणली
वेदवाणी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३२॥
वसे मेरु मांदार हे
सृष्टिलीळा ।
शशी सूर्य तारांगणें
मेघमाळा ।
चिरंजीव केले जनीं
दास दोन्ही ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३३॥
उपेक्षा कदा
रामरूपीं असेना ।
जिवां मानवां
निश्चयो तो वसेना ।
शिरीं भार वाहेन
बोले पुराणीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३४॥
असे हो जया अंतरीं
भाव जैसा ।
वसे हो तया अंतरीं
देव तैसा ।
अनन्यास रक्षीतसे
चापपाणी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३५॥
सदा सर्वदा देव
सन्नीध आहे ।
कृपाळूपणें अल्प
धारिष्ट पाहे ।
सुखानंद आनंद कैवल्य
दानी ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३६॥
सदा चक्रवाकासी
मार्तंड जैसा ।
उडी घालितो संकटीं
स्वामि तैसा ।
हरीभक्तिचा घाव
गाजेे निशाणीं ।
नुपेक्षी कदा राम
दासाभिमानी ॥३७॥
मना प्रार्थना तूजला
येक आहे ।
रघूराज थक्कीत होऊनि
पाहें ।
अवज्ञा कदा हो
येदर्थीं न कीजे ।
मना सज्जना राघवीं
वस्ति कीजे ॥३८॥
जया वर्णिती
वेदशास्त्रेंपुराणें ।
जयाचेनि योगें
समाधान बाणे ।
तयालागि हें सर्व
चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवीं
वस्ति कीजे ॥३९॥
मना पाविजे सर्वही
सूख जेथें ।
अती आदरें ठेविजे
लक्ष्य तेथें ।
विवेकें कुडी कल्पना
पालटीजे ।
मना सज्जना राघवीं
वस्ति कीजे ॥४०॥
बहू हिंडतां सौख्य
होणार नाहीं ।
सिणावें परी नातुडे
हीत कांहीं ।
विचारें बरें अंतरा
बोधवीजे ।
मना सज्जना राघवीं
वस्ति कीजे ॥४१॥
बहूतांपरी हेंचि
आतां धरावें ।
रघूनायका आपुलेसें
करावें ।
दिनानाथ हें तोडरीं
ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवीं
वस्ति कीजे ॥४२॥
मना सज्जना येक
जीवीं धरावें ।
जनीं आपुलें हीत
तुवां करावें ।
रघुनायकावीण बोलों
नको हो ।
सदा मानसीं तो
निजध्यास राहो ॥४३॥
मना रे जनीं
मौन्यमुद्रा धरावी ।
कथा आदरें राघवाची
करावी ।
नसे राम तें धाम
सोडूनी द्यावें ।
सुखालागिं आरण्य
सेवीत जावें ॥४४॥
जयाचेनि संगें
समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि
लागे ।
तये संगतीची जनीं
कोण गोडी ।
जिये संगतीनें मति
राम जोडी ॥४५॥
मना जे घडी
राघवेंवीण गेली ।
जनीं आपुली ते तुवां
हानि केली ।
रघुनायकावीण तो सीण
आहे ।
जनीं दक्ष तो लक्ष्य
लाऊनि पाहे ॥४६॥
मनीं लोचनीं श्रीहरी
तोचि पाहें ।
जनीं जाणता भक्त
होऊनि राहें ।
गुणीं प्रीति राखे
क्रमूं साधनचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥४७॥
सदा देवकाजीं झिजे
देह ज्याचा ।
सदा रामनामें वदे
नित्य वाचा ।
स्वधर्मेंचि चाले
सदा उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥४८॥
सदा बोलण्यासारिखें
चालताहे ।
अनेकीं सदा येक
देवासि पाहे ।
सगूणीं भजे लेश
नाहीं भ्रमाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥४९॥
नसे अंतरीं कामकारी
विकारी ।
उदासीन जो तापसी
ब्रह्मचारी ।
निवाला मनीं लेश
नाहीं तमाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५०॥
मदें मत्सरें
सांडिली स्वार्थबुद्धि ।
प्रपंचीक नाहीं
जयातें उपाधी ।
सदा बोलणें नम्र
वाचा सुवाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५१॥
क्रमी वेळ जो
तत्वचिंतानुवादें ।
न लिंपे कदा
दंभवादें विवादें ।
करी सूखसंवाद जो
ऊगमाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५२॥
सदा आर्जवी प्रीय जो
सर्व लोकीं ।
सदा सर्वदा सत्यवादी
विवेकी ।
न बोले कदा मिथ्य
वाचा त्रिवाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५३॥
सदा सेवि आरण्य
तारुण्यकाळीं ।
मिळेना कदा
कल्पनेचेनि मेळीं ।
चळेना मनीं निश्चयो
दृढ ज्याचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५४॥
नसे मानसीं नष्ट आशा
दुराशा ।
वसे अंतरीं
प्रेमपाशा पिपाशा ।
ऋणी देव हा
भक्तिभावें जयाचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५५॥
दिनाचा दयाळू मनाचा
मवाळु ।
स्नेहाळू कृपाळू
जनीं दासपाळु ।
तया अंतरीं क्रोध
संताप कैंचा ।
जगीं धन्य तो दास
सर्वोत्तमाचा ॥५६॥
जगीं होइजे धन्य या
रामनामें ।
क्रिया भक्ति ऊपासना
नित्यनेमें ।
उदासीनता तत्वता सार
आहे ।
सदा सर्वदा मोकळी
वृत्ति राहे ॥५७॥
नको वासना वीषईं
वृत्तिरूपें ।
यदर्थीं जडे कामना
पूर्वपापें ।
सदा राम निःकाम
चिंतीत जावा ।
मना कल्पनालेश तोही
नसावा ॥५८॥
मना कल्पना कल्पितां
कल्पकोटी ।
नव्हे रे नव्हे
सर्वथा रामभेटी ।
मनीं कामना राम
नाहीं जयाला ।
अती आदरें प्रीति
नाहीं तयाला ॥५९॥
मना राम कल्पतरू
कामधेनु ।
निधी सार चिंतामणी
काय वानूं ।
जयाचेनि योगें घडे
सर्व सत्ता ।
तया साम्यता कायसी
कोण आतां ॥६०॥
उभा कल्पवृक्षातळीं
दुःख वाहे ।
तया अंतरीं सर्वदा
तेंचि आहे ।
जनीं सज्जनीं वाद हा
वाढवावा ।
पुढें मागुतां शोक
जीवीं धरावा ॥६१॥
निजध्यास तो सर्व
तूटोनी गेला ।
बळें अंतरीं
शोकसंताप ठेला ।
सुखानंद आनंद भेदें
बुडाला ।
मनीं निश्चयो सर्व
खेदें उडाला ॥६२॥
घरीं कामधेनू पुढें
ताक मागे ।
हरीबोध सांडूनि
वेवाद लागे ।
करीं सार चिंतामणी
काचखंडें ।
तया मागतां देत आहे
उदंडें ॥६३॥
अती मूढ त्या दृढ
बुद्धी असेना ।
अती काम त्या राम
चित्तीं वसेना ।
अती लोभ त्या क्षोभ
होईल जाणा ।
अती वीषई सर्वदा
दैन्यवाणा ॥६४॥
नको दैन्यवाणें
जिणें भक्तिऊणें ।
अती मूर्ख त्या
सर्वदा दुःख दूणें ।
धरीं रे मना आदरें
प्रीति रामीं ।
नको वासना हेमधामीं
विरामीं ॥६५॥
नव्हे सार संसार हा
घोर आहे ।
मना सज्जना सत्य
शोधूनि पाहें ।
जनीं वीष खातां
पुढें सूख कैचें ।
करीं रे मना ध्यान
या राघवाचें ॥६६॥
घनश्याम हा राम
लावण्यरूपी ।
महा धीर गंभीर
पूर्णप्रतापी ।
करी संकटीं सेवकाचा
कुडावा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥६७॥
बळें आगळा राम
कोदंडधारी ।
महाकाळ विक्राळ तोही
थरारी ।
पुढें मानवा किंकरा
कोण केवा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥६८॥
सुखानंदकारी निवारी
भयातें ।
जनीं भक्तिभावें
भजावें तयातें ।
विवेकें त्यजावा
अनाचार हेवा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥६९॥
सदा रामनामें वदा
पूर्णकामें ।
कदा बाधिजेना पदा
नित्यनेमें ।
मदालस्य हा सर्व
सोडूनि द्यावा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७०॥
जयाचेनि नामें
महादोष जाती ।
जयाचेनि नामें गती
पाविजेती ।
जयाचेनि नामें घडे
पुण्यठेवा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७१॥
न वेंचे कदा
ग्रंथिंचे अर्थ कांहीं ।
मुखें नाम
उच्चारितां कष्ट नाहीं ।
महाघोर संसार शत्रू
जिणावा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७२॥
देहेदंडणेचें
महादुःख आहे ।
महां दुःख तें नाम
घेतां न राहे ।
सदाशीव चिंतीतसे
देवदेवा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७३॥
बहुतांपरी संकटें
साधनाचीं ।
व्रतें दान
उद्यापनें तीं धनाचीं ।
दिनाचा दयाळू मनीं
आठवावा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७४॥
समस्तामध्यें सार
साचार आहे ।
कळेना तरी सर्व
शोधून पाहे ।
जिवा संशयो वाउगा तो
त्यजावा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७५॥
नव्हे कर्म ना धर्म
ना योग कांहीं ।
नव्हे भोग ना त्याग
ना सांग पाहीं ।
म्हणे दास विश्वास
नामीं धरावा ।
प्रभाते मनीं राम
चिंतीत जावा ॥७६॥
करी काम निःकाम या
राघवाचें ।
करी रूप स्वरूप
सर्वां जिवांचें ।
करी छंद निर्द्वंद्व
हे गूण गातां ।
हरीकीर्तनीं
वृत्तििवश्वास होतां ॥७७॥
अहो ज्या नरा
रामविश्वास नाहीं ।
तया पामरा बाधिजे
सर्व कांहीं ।
महाराज तो स्वामि
कैवल्यदाता ।
वृथा वाहणें
देहसंसारचिंता ॥७८॥
मना पावना भावना
राघवाची ।
धरी अंतरीं सोडिं
चिंता भवाची ।
भवाची जिवा मानवा
भूलि ठेली ।
नसे वस्तुची धारणा
व्यर्थ गेली ॥७९॥
धरा श्रीवरा त्या
हरा अंतरातें ।
तरा दुस्तरा त्या
परा सागरातें ।
सरा वीसरा त्या भरा
दुर्भरातें ।
करा नीकरा त्या खरा
मत्सरातें ॥८०॥
मना मत्सरें नाम
सांडूं नको हो ।
अती आदरें हा
निजध्यास राहो ।
समस्तांमध्यें नाम
हें सार आहे ।
दुजी तूळणा
तूळीतांही न साहे ॥८१॥
बहू नाम या रामनामीं
तुळेना ।
अभाग्या नरा पामरा
हें कळेना ।
विषा औषध घेतलें
पार्वतीशें ।
जिवा मानवा किंकरा
कोण पूसे ॥८२॥
जेणें जाळीला काम तो
राम ध्यातो ।
उमेसीं अती आदरें
गूण गातो ।
बहू ज्ञान वैराग्य
सामर्थ्य जेथें ।
परी अंतरीं
नामविश्वास तेथें ॥८३॥
विठोने शिरीं वाहिला
देवराणा ।
तया अंतरीं ध्यास रे
त्यासि नेणा ।
निवाला स्वयें तापसी
चंद्रमौळी ।
जिवां सोडवी राम हा
अंतकाळीं ॥८४॥
भजा राम विश्राम
योगेश्वरांचा ।
जपू नेमिला नेम
गौरीहराचा ।
स्वयें नीववी तापसी
चंद्रमौळी ।
तुम्हां सोडवी राम
हा अंतकाळीं ॥८५॥
मुखीं राम विश्राम
तेंथेंचि आहे ।
सदानंद आनंद सेऊनि
राहे ।
तयावीण तो सीण
संदेहकारी ।
निजधाम हें नाम
शोकापहारी ॥८६॥
मुखीं राम त्या काम
बाधूं शकेना ।
गुणें इष्ट धारिष्ट
त्याचें चुकेना ।
हरीभक्त तो शक्त
कामास मारी ।
जगीं धन्य तो मारुती
ब्रह्मचारी ॥८७॥
बहू चांगलें नाम या
राघवाचें ।
अती साजिरें स्वल्प
सोपें फुकाचें ।
करी मूळ निर्मूळ
घेतां भवाचें ।
जिवां मानवां हेंचि
कैवल्य साचें ॥८८॥
जनीं भोजनीं नाम
वाचे वदावें ।
अती आदरें गद्य
घोषें म्हणावें ।
हरीचिंतनें अन्न
जेवीत जावें ।
तरी श्रीहरी
पाविजेतो स्वभावें ॥८९॥
न ये राम वाणी तया
थोर हाणी ।
जनीं व्यर्थ प्राणी
तया नाम काणी ।
हरीनाम हें
वेदशास्त्रीं पुराणीं ।
बहू आगळें बोलिली
व्यासवाणी ॥९०॥
नको वीट मानूं
रघूनायकाचा ।
अती आदरें बोलिजे
राम वाचा ।
न वेचे मुखीं सांपडे
रे फुकाचा ।
करीं घोष त्या
जानकीवल्लभाचा ॥९१॥
अती आदरें सर्व ही
नामघोषें ।
गिरीकंदरीं जाइजे
दूर दोषें ।
हरी तिष्ठतु तोषला
नामघोषें ।
विशेषें हरा मानसीं
रामपीसें ॥९२॥
जगीं पाहतां देव हा
अन्नदाता ।
तया लागली तत्वतां
सार चिंता ।
तयाचें मुखीं नाम
घेता फुकाचें ।
मना सांग पां रे
तुझें काय वेंचे ॥९३॥
तिन्ही लोक जाळूं
शके कोप येतां ।
निवाला हरू तो मुखें
नाम घेतां ।
जपे आदरें पार्वती
विश्वमाता ।
म्हणोनी म्हणा तेंचि
हें नाम आतां ॥९४॥
अजामेळ पापी वदें
पुत्रकामें ।
तया मुक्ति
नारायणाचेनि नामें ।
शुकाकारणें कुंटणी
राम वाणी ।
मुखें बोलतां ख्याति
जाली पुराणीं ॥९५॥
महाभक्त प्रल्हाद हा
दैत्यकूळीं ।
जपे रामनामावळी
नित्यकाळीं ।
पिता पापरूपी तया
देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम
मूखें म्हणेना ॥९६॥
मुखीं नाम नाहीं तया
मुक्ति कैंची ।
अहंतागुणें यातना ते
फुकाची ।
पुढें अंत येईल तो
दैन्यवाणा ।
म्हणोनी म्हणा रे
म्हणा देवराणा ॥९७॥
हरीनाम नेमस्त पाषाण
तारी ।
बहु तारिले
मानवीदेहधारी ।
तया रामनामीं सदा जो
विकल्पी ।
वदेना कदा जीव तो
पापरूपी ॥९८॥
जगीं धन्य वाराणसी
पुण्यरासी ।
तयेमाजिं जातां गती
पूर्वजांसी ।
मुखें रामनामावळी
नित्यकाळीं ।
जिवा हीत सांगे सदा
चंद्रमौळी ॥९९॥
येथासांग रे कर्म तेंहि
घडेना ।
घडे कर्म तें पुण्य
गांठीं पडेना ।
दया पाहतां
सर्वभूतीं असेना ।
फुकाचें मुखीं नाम
तेंही वसेना ॥१००॥
जया नावडे नाम त्या
यम जाची ।
विकल्पें उठे तर्क
त्या नर्क ची ची ।
म्हणोनी अति आदरें
नाम घ्यावें ।
मुखें बोलतां दोष
जाती स्वभावें ॥१०१॥
अती लीनता सर्वभावें
स्वभावें ।
जना सज्जनांलागि
संतोषवावें ।
देहे कारणीं सर्व
लावीत जावें ।
सगूणी अती आदरेंसीं
भजावें ॥१०२॥
हरीकीर्तनें प्रीति
रामीं धरावी ।
देहेबुद्धि निरूपणीं
वीसरावी ।
परद्रव्य आणीक कांता
परावी ।
येदर्थीं मना सांडि
जीवीं करावी ॥१०३॥
क्रियेवीण नानापरी
बोलिजेतें ।
परी चित्त दुश्चीत
तें लाजवीतें ।
मना कल्पना धीट
सैराट धांवे ।
तया मानवा देव
कैसेनि पावे ॥१०४॥
विवेकें क्रिया
आपुली पालटावी ।
अती आदरें शुद्ध
क्रीया धरावी ।
जनीं बोलण्यासारिखें
चाल बापा ।
मना कल्पना सोडिं
संसारतापा ॥१०५॥
बरी स्नानसंध्या
करीं येकनिष्ठा ।
विवेकें मना आवरी
स्थानभ्रष्टा ।
दया सर्व भूतीं जया
मानवाला ।
सदा प्रेमळू
भक्तिभावें निवाला ॥१०६॥
मना कोपआरोपणा ते
नसावी ।
मना बुद्धि हे
साधुसंगीं वसावी ।
मना नष्ट चांडाळ तो
संग त्यागी ।
मना होई रे
मोक्षभागीं विभागी ॥१०७॥
सदा सर्वदा
सज्जनाचेनि योगें ।
क्रिया पालटे
भक्तिभावार्थ लागे ।
क्रियेवीण वाचाळता
ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥१०८॥
जनीं वादवेवाद
सोडूनि द्यावा ।
जनीं सूखसंवाद सूखें
करावा ।
जनीं तोचि तो
शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥१०९॥
तुटे वाद संवाद
त्यातें म्हणावें ।
विवेकें अहंभाव
यातें जिणावें ।
अहंतागुणें वाद नाना
विकारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥११०॥
हिताकारणें बोलणें
सत्य आहे ।
हिताकारणें सर्व
शोधूनि पाहे ।
हिताकारणें बंड
पाखांड वारीं ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥१११॥
जनीं सांगतां ऐकतां
जन्म गेला ।
परी वाद वेवाद
तैसाचि ठेला ।
उठे संशयो वाद हा
दंभधारी ।
तुटे वाद संवाद तो
हीतकारी ॥११२॥
जनीं हीत पंडीत
सांडीत गेले ।
अहंतागुणें
ब्रह्मराक्षस जाले ।
तयांहूनि व्युत्पन्न
तो कोण आहे ।
मना सर्व जाणीव
सांडूनि राहें ॥११३॥
फुकाचें मुखीं
बोलतां काय वेंचे ।
दिसेंदीस अभ्यंतरीं
गर्व सांचे ।
क्रियेवीण वाचाळतां
व्यर्थ आहे ।
विचारें मना तूंचि
शोधून पाहे ॥११४॥
तुटे वाद संवाद
तेथें करावा ।
विवेकें अहंभाव हा
पालटावा ।
जनीं बोलण्यासारिखें
आचरावें ।
क्रियापालटें
भक्तिपंथेचि जावें ॥११५॥
बहू श्रापितां
कष्टला अंबऋषी ।
तयाचे स्वयें
श्रीहरी जन्म सोशी ।
दिल्हा क्षीरसिंधू
तया ऊपमानी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११६॥
धुरुं लेकरूं
बापुडें दैन्यवाणें ।
कृपा भाकिता दीधली
भेटि जेणें ।
चिरंजीव तारांगणीं
प्रेमखाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११७॥
गजेंद्रू महासंकटिं वाट
पाहे ।
तयाकारणें श्रीहरी
धांवताहे ।
उडी घातली जाहला
जीवदानी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११८॥
अजामेळ पापी तया अंत
आला ।
कृपाळूपणें तो जनीं
मुक्त केला ।
अनाथासि आधार हा
चक्रपाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥११९॥
विधीकारणें जाहला
मत्स्य वेगीं ।
धरी कूर्मरूपें धरा
पृष्ठभागीं ।
जना रक्षणाकारणें
नीच योनी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२०॥
महा भक्त प्रल्हाद
हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणें
सिंह जाला ।
न ये ज्वाळ वीशाळ
संन्नीध कोण्ही ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२१॥
कृपा भाकितां जाहला
वज्रपाणी ।
तयाकारणें वामनु
चक्रपाणी ।
द्विजाकारणें भार्गव
चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२२॥
अहिल्ये सतीलागि
आरण्यपंथें ।
कुडावा पुढें देव
बंदीं तयांतें ।
बळें सोडितां घाव
घाली निशाणीं ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२३॥
तये द्रौपदीकारणें
लागवेगें ।
त्वरें धांवतू सर्व
सांडूनि मागें ।
कळीलागि जाला असें
बोद्ध मौनी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२४॥
अनाथां दिनां कारणें
जन्मताहे ।
कलंकी पुढें देव
होणार आहे ।
जया वर्णितां सीणली
वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव
भक्ताभिमानी ॥१२५॥
जनाकारणें देव
लीळावतारी ।
बहूतांपरीं आदरें
वेषधारी ।
तया नेणती ते जन
पापरूपी ।
दुरात्मे महानष्ट
चांडाळ पापी ॥१२६॥
जगीं धन्य तो
रामसूखें निवाला ।
कथा ऐकतां सर्व
तल्लीन जाला ।
देहेभावना रामबोधें
उडाली ।
मनोवासना रामरूपीं
बुडाली ॥१२७॥
मना वासना वासुदेवीं
वसों दे ।
मना कामना कामसंगीं
नसों दे ।
मना कल्पना वाउगी ते
न कीजे ।
मना सज्जना सज्जनीं
वस्ति कीजे ॥१२८॥
गतीकारणें संगती
सज्जनाची ।
मती पालटे सूमती
दुर्जनाची ।
रतीनायकाचा पती नष्ट
आहे ।
म्हणोनी मनातीत
होऊनि राहे ॥१२९॥
मना अल्प संकल्प तो
ही नसावा ।
सदा सत्य संकल्प
चित्तीं वसावा ।
जनीं जल्प वीकल्प
तोही त्यजावा ।
रमाकांत येकांतकाळीं
भजावा ॥१३०॥
भजाया जनीं पाहतां
राम येकू ।
करीं बाण येकू मुखीं
शब्द येकू ।
क्रिया पाहतां
उद्धरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा
विवेकू ॥१३१॥
विचारूनि बोले
विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही
निवाले ।
बरें शोधल्यावीण बोलों
नको हो ।
जनीं चालणें शुद्ध
नेमस्त राहो ॥१३२॥
हरीभक्त वीरक्त
विज्ञानराशी ।
जेणें मानसीं
स्थापिलें निश्चयाशीं ।
तया दर्शनें
स्पर्शनें पुण्य जोडे ।
तया भाषणें नष्ट
संदेह मोडे ॥१३३॥
नसे गर्व आंगीं सदा
वीतरागी ।
क्षमा शांति भोगी
दयादक्ष योगी ।
नसे लोभ ना क्षोभ ना
दैन्यवाणा ।
इहीं लक्षणीं जाणिजे
योगिराणा ॥१३४॥
धरीं रे मना संगती
सज्जनाची ।
जेणें वृत्ति हे
पालटे दुर्जनाची ।
बळें भाव सद्बुद्धि
सन्मार्ग लागे ।
महा क्रूर तो काळ
विक्राळ भंगे ॥१३५॥
भयें व्यापिलें सर्व
ब्रह्मांड आहे ।
भयातीत तें संत आनंत
पाहें ।
जया पाहतां द्वैत
कांहीं दिसेना ।
भय मानसीं सर्वथा ही
असेना ॥१३६॥
जिवा श्रेष्ठ ते
स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान
तैसेचि ठेले ।
देहेबुद्धिचें कर्म
खोटें टळेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१३७॥
भ्रमें नाडळे वित्त
तें गुप्त जालें ।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि
आलें ।
देहेबुद्धिचा
निश्चयो ज्या टळेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१३८॥
पुढें पाहतां सर्व
ही कोंदलेंसे ।
अभाग्यास हें दृश्य
पाषाण भासे ।
अभावें कदा पुण्य
गांठी पडेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१३९॥
जयाचें तया चूकलें
प्राप्त नाहीं ।
गुणें गोविलें
जाहलें दुःख देहीं ।
गुणावेगळी वृत्ति
तेही वळेना ।
जुनें ठेवणें मीपणें
आकळेना ॥१४०॥
म्हणे दास सायास
त्याचे करावे ।
जनीं जाणता पाय
त्याचे धरावे ।
गुरुअंजनेवीण तें
आकळेना ।
जुनें ठेवणें मीपणें
तें कळेना ॥१४१॥
कळेना कळेना कळेना
ढळेना ।
ढळे नाढळे संशयो ही ढळेना
।
गळेना गळेना अहंता
गळेना ।
बळें आकळेना मिळेना
मिळेना ॥१४२॥
अविद्यागुणें मानवा
ऊमजेना ।
भ्रमें चूकलें हीत
ते आकळेना ।
परीक्षेविणें
बांधलें द्ृढ नाणें ।
परी सत्य मिथ्या
असें कोण जाणे ॥१४३॥
जगीं पाहतां साच तें
काय आहे ।
अती आदरें सत्य
शोधूनि पाहें ।
पुढें पाहतां पाहतां
देव जोडे ।
भ्रमें भ्रांति
अज्ञान हें सर्व मोडे ॥१४४॥
सदा वीषयो चिंतितां
जीव जाला ।
अहंभाव अज्ञान
जन्मासि आला ।
विवेकें सदा
स्वस्वरूपीं भरावें ।
जिवा ऊगमीं जन्म
नाहीं स्वभावें ॥१४५॥
दिसे लोचनीं तें नसे
कल्पकोडी ।
अकस्मात आकारलें काळ
मोडी ।
पुढें सर्व जाईल
कांहीं न राहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहे ॥१४६॥
फुटेना तुटेना चळेना
ढळेना ।
सदा संचलें मीपणें
तें कळेना ।
तया एकरूपासि दुजें
न साहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१४७॥
निराकार आधार
ब्रह्मादिकांचा ।
जया सांगतां सीणली
वेदवाचा ।
विवेकें तदाकार
होऊनि राहें ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१४८॥
जगीं पाहतां
चर्मचक्षीं न लक्षे ।
जगीं पाहतां
ज्ञानचक्षीं नरक्षे ।
जगीं पाहतां पाहणें
जात आहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१४९॥
नसे पीत ना श्वेत ना
श्याम कांहीं ।
नसे व्यक्त अव्यक्त
ना नीळ नाहीं ।
म्हणे दास
विश्वासतां मुक्ति लाहे ।
मना संत आनंत शोधूनि
पाहें ॥१५०॥
खरें शोधितां
शोधितां शोधताहे ।
मना बोधितां बोधितां
बोधताहे ।
परी सर्व ही
सज्जनाचेनि योगें ।
बरा निश्चयो पाविजे
सानुरागें ॥१५१॥
बहूतांपरी कूसरी
तत्वझाडा ।
परी अंतरीं पाहिजे
तो निवाडा ।
मना सार साचार तें
वेगळें रे ।
समस्तांमधें येक तें
आगळें रे ॥१५२॥
नव्हे पिंडज्ञानें
नव्हे तत्वज्ञानें ।
समाधान कांहीं नव्हे
तानमानें ।
नव्हे योगयागें
नव्हे भोगत्यागें ।
समाधान तें
सज्जनाचेनि योगें ॥१५३॥
महावाक्य तत्वादिकें
पंचीकर्णें ।
खुणें पाविजे
संतसंगें विवर्णें ।
द्वितीयेसि संकेत जो
दाविजेतो ।
तया सांडुनी चंद्रमा
भाविजेतो ॥१५४॥
दिसेना जनीं तेंचि
शोधूनि पाहें ।
बरें पाहतां गूज
तेथेंचि आहे ।
करीं घेऊं जातां कदा
आडळेना ।
जनीं सर्व कोंदाटलें
तें कळेना ॥१५५॥
म्हणे जाणता तो जनीं
मूर्ख पाहें ।
अतर्कासि तर्की असा
कोण आहे ।
जनीं मीपणें पाहतां
पाहवेना ।
तया लक्षितां वेगळें
राहवेना ॥१५६॥
बहू शास्त्र
धुंडाळितां वाड आहे ।
जया निश्चयो येक
तोही न साहे ।
मती भांडती
शास्त्रबोधें विरोधें ।
गती खुंटती
ज्ञानबोधें प्रबोधें ॥१५७॥
श्रुति न्याय
मीमांसकें तर्कशास्त्रें ।
स्मृति वेद
वेदान्तवाक्यें विचित्रें ।
स्वयें शेष मौनावला
स्थीर राहे ।
मना सर्व जाणीव
सांडून पाहे ॥१५८॥
जेणें मक्षिका
भक्षिली जाणिवेची ।
तया भोजनाची रुची
प्राप्ति कैंची ।
अहंभाव ज्या मानसीचा
विरेना ।
तया ज्ञान हें अन्न
पोटीं जिरेना ॥१५९॥
नको रे मना वाद हा
खेदकारी ।
नको रे मना भेद नाना
विकारी ।
नको रे मना सीकऊं
पुढिलांसि ।
अहंभाव जो राहिला
तूजपासीं ॥१६०॥
अहंतागुणें सर्व ही
दुःख होतें ।
मुखें बोलिलें ज्ञान
तें व्यर्थ जातें ।
सुखी राहतां सर्वही
सूख आहे ।
अहंता तुझी तूंचि
शोधूनि पाहें ॥१६१॥
अहंतागुणें नीति
सांडि विवेकी ।
अनीतीबळें श्लाघ्यता
सर्व लोकीं ।
परी अंतरीं सर्वही
साक्ष येते ।
प्रमाणांतरें बुद्धि
सांडूनि जाते ॥१६२॥
देहेबुद्धिचा
निश्चयो दृढ जाला ।
देहातीत तें हीत
सांडीत गेला ।
देहेबुद्धि ते
आत्मबुद्धि करावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६३॥
मनें कल्पिला वीषयो
सोडवावा ।
मनें देव निर्गूण तो
वोळखावा ।
मनें कल्पितां
कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६४॥
देहादीक प्रपंच हा
चिंतियेला ।
परी अंतरीं लोभ
निश्चिंत ठेला ।
हरीचिंतनें
मुक्तिकांता वरावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६५॥
अहंकार विस्तारला या
देहाचा ।
स्त्रियापुत्रमित्रादिकें
मोह त्यांचा ।
बळें भ्रांति हे
जन्मचिंता हरावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६६॥
बरा निश्चयो
शाश्वताचा करावा ।
म्हणें दास संदेह तो
वीसरावा ।
घडीनें घडी
सार्थकाची करावी ।
सदा संगती सज्जनाची
धरावी ॥१६७॥
करी वृत्ति जो संत
तो संत जाणा ।
दुराशागुणें जो
नव्हे दैन्यवाणा ।
उपाधी देहेबुद्धितें
वाढवीते ।
परी सज्जना कवि
बाधूं शके ते ॥१६८॥
नसे अंत आनंत संता
पुसावा ।
अहंकार विस्तार हा
नीरसावा ।
गुणेंवीण निर्गूण तो
आठवावा ।
देहेबुद्धिचा आठवो
नाठवावा ॥१६९॥
देहेबुद्धि हे
ज्ञानबोधें त्यजावी ।
विवेकें तये वस्तुची
भेटि घ्यावी ।
तदाकार हे वृत्ति
नाहीं स्वभावें ।
म्हणोनी सदा तेंचि
शोधीत जावें ॥१७०॥
असे सार साचार तें
चोरलेंसें ।
इहीं लोचनीं पाहतां
दृश्य भासे ।
निराभास निर्गूण तें
आकळेना ।
अहंतागुणें
कल्पितांही कळेना ॥१७१॥
स्फुरे वीषयीं
कल्पना ते अविद्या ।
स्फुरे ब्रह्म रे
जाण माया सुविद्या ।
मुळीं कल्पना
दोरुपें तेचि जाली ।
विवेकें तरी
स्वस्वरुपीं मिळाली ॥१७२॥
स्वरुपीं उदेला
अहंकार राहो ।
तेणें सर्व
आछ्यादिलें व्योम पाहों ।
दिशा पाहतां ते निशा
वाढताहे ।
विवेकें विचारें
विवंचूनि पाहे ॥१७३॥
जया चक्षुनें
लक्षितां लक्षवेना ।
भवा भक्षितां
रक्षितां रक्षवेना ।
क्षयातीत तो अक्षयी
मोक्ष देतो ।
दयादक्ष तो
साक्षिनें पक्ष घेतो ॥१७४॥
विधी निर्मितां
लीहितो सर्व भाळीं ।
परी लीहितो कोण
त्याचे कपाळीं ।
हरु जाळितो लोक
संहारकाळीं ।
परी सेवटीं शंकरा
कोण जाळी ॥१७५॥
जगीं द्वादशादित्य
हे रुद्र अक्रा ।
असंख्यात संख्या करी
कोण शक्रा ।
जगीं देव धुंडाळितां
आढळेना ।
जनीं मुख्य तो कोण
कैसा कळेना ॥१७६॥
तुटेना फुटेना कदा
देवराणा ।
चळेना ढळेना कदा
दैन्यवाणा ।
कळेना कळेना कदा
लोचनासी ।
वसेना दिसेना जनीं
मीपणासी ॥१७७॥
जया मानला देव तो
पूजिताहे ।
परी देव शोधूनि कोणी
न पाहे ।
जगीं पाहतां देव
कोट्यानकोटी ।
जया मानिली भक्ति जे
तेचि मोठी ॥१७८॥
तिन्हीं लोक जेथूनि
निर्माण जाले ।
त्या देवरायासि कोणी
न बोले ।
जगीं थोरला देव तो
चोरलासे ।
गुरूवीण तो सर्वथाही
न दीसे ॥१७९॥
गुरु पाहतां पाहतां
लक्ष कोटी ।
बहूसाल मंत्रावळी
शक्ति मोठी ।
मनीं कामना चेटकें
धातमाता ।
जनीं व्यर्थ रे तो
नव्हे मुक्तिदाता ॥१८०॥
नव्हे चेटकू चाळकू
द्रव्यभोंदू ।
नव्हे निंदकू मत्सरु
भक्तिमंदू ।
नव्हे उन्मतू व्यसनी
संगबाधू ।
जनीं ज्ञानिया तोचि
साधू अगाधु ॥१८१॥
नव्हे वाऊगी चाहुटी
काम पोटीं ।
क्रियेवीण वाचाळता
तेचि मोठी ।
मुखें
बोलिल्यासारिखें चालताहे ।
मना सद्गुरु तोचि
शोधूनि पाहे ॥१८२॥
जनीं भक्त ज्ञानी
विवेकी विरागी ।
कृपाळू मनस्वी
क्षमावंत योगी ।
प्रभू दक्ष
व्युत्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेन योगें समाधान
बाणे ॥१८३॥
नव्हे तेचि जालें
नसें तेंचि आलें ।
कळों लागलें
सज्जनाचेनि बोलें ।
अनिर्वाच्य तें
वाच्य वाचे वदावें ।
मना संत आनंत शोधीत
जावें ॥१८४॥
लपावें अती आदरें
रामरूपीं ।
भयातीत निश्चिंत ये
स्वस्वरूपीं ।
कदा तो जनीं
पाहतांही दिसेना ।
सदा ऐक्य तो
भिन्नभावें वसेना ॥१८५॥
सदा सर्वदा राम
सन्नीध आहे ।
मना सज्जना सत्य
शोधून पाहे ।
अखंडीत भेटी
रघूराजयोगु ।
मना सांडि रे
मीपणाचा वियोगु ॥१८६॥
भुतें पिंड
ब्रह्मांड हें ऐक्य आहे ।
परी सर्वही
स्वस्वरूपीं न साहे ।
मना भासलें सर्व
कांहीं पहावें ।
परी संग सोडूनि
सूखीं रहावें ॥१८७॥
देहेभान हें
ज्ञानशस्त्रें खुडावें ।
विदेहीपणें
भक्तिमार्गेंचि जावें ।
विरक्तीबळें निंद्य
सर्वै त्यजावें ।
परी संग सोडूनि
सूखें रहावें ॥१८८॥
मही निर्मिली देव तो
वोळखावा ।
जया पाहतां मोक्ष
तत्काळ जीवा ।
तया निर्गुणालागि
गूणी पहावें ।
परी संग सोडूनि
सूखें रहावें ॥१८९॥
नव्हे कार्यकर्ता
नव्हे सृष्टिभर्ता ।
परेहूनि पर्ता न
लिंपे विवर्ता ।
तया निर्विकल्पासि
कल्पीत जावें ।
परी संग सोडूनि
सूखें रहावें ॥१९०॥
देहेबुद्धिचा
निश्चयो ज्या ढळेना ।
तया ज्ञान
कल्पांतकाळीं कळेना ।
परब्रह्म तें मीपणें
आकळेना ।
मनीं शून्य अज्ञान
हें मावळेना ॥१९१॥
मना ना कळे ना ढळे
रूप ज्याचें ।
दुजेवीण तें ध्यान
सर्वोत्तमाचें ।
तया खूण ते हीण
द्ृष्टांत पाहे ।
तेथें संग निःसंग
दोनी न साहे ॥१९२॥
नव्हे जाणता नेणता
देवराणा ।
न ये वर्णितां
वेदशास्त्रा पुराणा ।
नव्हे दृश्य अदृश्य
साक्षी तयाचा ।
श्रुति नेणती नेणती
अंत त्याचा ॥१९३॥
वसे हृदईं देव तो
कोण कैसा ।
पुसे आदरें साधकू
प्रश्न ऐसा ।
देहे टाकितां देव
कोठे रहातो ।
परी मागुता ठाव
कोठें पहातो ॥१९४॥
वसे हृदईं देव तो
जाण ऐसा ।
नभाचेपरी व्यापकू
जाण तैसा ।
सदा संचला येत ना
जात कांहीं ।
तयावीण कोठें रिता
ठाव नाहीं ॥१९५॥
नभीं वावरे जो
अणुरेणु कांहीं ।
रिता ठाव या
राघवेंवीण नाहीं ।
तया पाहतां पाहतां
तेंचि जालें ।
तेथें लक्ष आलक्ष
सर्वे बुडालें ॥१९६॥
नभासारिखें रूप या
राघवाचें ।
मनीं चिंतितां मूळ
तूटे भवाचें ।
तया पाहतां
देहबुद्धी उरेना ।
सदा सर्वदा आर्त
पोटीं पुरेना ॥१९७॥
नभें व्यापिलें सर्व
सृष्टीस आहे ।
रघूनायका उपमा ते न
साहे ।
दुजेवीण जो तोचि तो
हा स्वभावें ।
तया व्यापकू व्यर्थ
कैसें म्हणावें ॥१९८॥
अतीजीर्ण विस्तीर्ण
तें रूप आहे ।
तेथें तर्कसंपर्क
तोही न साहे ।
अती गूढ तें दृढ
तत्काळ सोपें ।
दुजेवीण जें खूण
स्वामिप्रतापें ॥१९९॥
कळे आकळे रूप तें
ज्ञान होतां ।
तेथें आटली
सर्वसाक्षी अवस्था ।
मना उन्मनीं शब्द
कुंठीत राहे ।
तो गे तोचि तो राम
सर्वत्र पाहे ॥२००॥
कदा वोळखीमाजि दूजें
दिसेना ।
मनीं मानसीं द्वैत
कांहीं वसेना ।
बहूतां दिसां आपुली
भेटि जाली ।
विदेहीपणें सर्व
काया निवाली ॥२०१॥
मना गूज रे तूज हें
प्राप्त जालें ।
परी अंतरीं पाहिजे
यत्न केले ।
सदा श्रवणें पाविजे
निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य
होसी ॥२०२॥
मना सर्वही संग
सोडूनि ध्यावा ।
अती आदरें सज्जनाचा
धरावा ।
जयाचेनि संगें
महादुःख भंगे ।
जनीं साधनेंवीण
सन्मार्ग लागे ॥२०३॥
मना संग हा सर्व
संगास तोडी ।
मना संग हा मोक्ष
तत्काळ जोडी ।
मना संग हा साधकां
सीघ्र सोडी ।
मना संग हा द्वैत
निःशेष मोडी ॥२०४॥
मनाची शतें ऐकतां
दोष जाती ।
मतीमंद ते साधना
योग्य होती ।
चढे ज्ञान वैराग्य
सामर्थ्य अंगीं ।
म्हणे दास विश्वासतां
मुक्ति भोगी ॥२०५॥

No comments:
Post a Comment